जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

*मुक्ताईनगर तालुक्यात समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न

  • मुक्ताईनगर
    समावेशित शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी सेविका, व मदतनीस यांच्यासाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला.

दि.२४ व २५ मार्च 2026 रोजी जि.प.मराठी शाळा कोथळी येथे आयोजित या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मा.गटशिक्षणाधिकारी श्री. वसंतराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थी वेदांत पाटील याच्या हस्ते लुई ब्रेल व हेलेन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनिल कोंघे तसेच केंद्रप्रमुख श्री संजय ठोसर, श्री ज्ञानेश्वर पाटील, श्री इरफान तडवी, श्री महेंद्र मालवेकर उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन श्री प्रविण सोनवणे यांनी केले व प्रशिक्षणाचे सूत्र संचालन श्री नितिन झोपे यांनी केले.
या प्रशिक्षण वर्गात समावेशित शिक्षणाची संकल्पना, दिव्यांगाचे प्रकार ,कारणे व उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्रीमती अश्विनी पाटील व श्री संजय पाटील यांनी केले. श्री नितिन झोपे यांनी दिव्यांगाना आवश्यक सोई सुविधा व साहित्य साधने यावर मार्गदर्शन केले.श्री विजय पाटील यांनी दिव्यांग बाबतीत शासन निर्णय यावर मार्गदर्शन केले. श्रीमती अश्विनी पाटील यांनी प्रशस्त अॕप व दिव्यांग यु आय डी कार्ड याबाबत मार्गदर्शन केले.श्री निलेश कदम यांनी ब्रेल कीट विषयी मार्गदर्शन केले.श्री भुषण सोनवणे यांनी दिव्यांग विद्यार्थी मूल्यमापन बाबत मार्गदर्शन केले.प्रशिक्षण स्थळी प्रशिक्षणार्थींना चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सर्व विशेष शिक्षकांनी परिश्रम घेतले.
सदर प्रशिक्षण वर्गास पालक, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी सेविका, व पर्यवेक्षक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button