अखेर जळगाव जामोद मतदार संघाचा तिढा सुटला.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस हरिदास इंदोरे.जळगाव जामोद.
सौ स्वाती वाकेकर त्यांच्या नावाची घोषणा
जळगाव जामोद विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अखेर तिढा सुटला माजी आमदार कृष्णाराव इंगळे यांची कन्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सौ स्वातीताई संदीप वाकेकर यांना पुन्हा महाविकास आघाडी कडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ संजयजी कुटे यांना काही दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झालेली असून. त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. नामांकन अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे पक्ष नेत्या तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सौ स्वातीताई संदीप वाकेकर यांना संधी मिळेल हे जवळपास निश्चित होते. त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभा मतदारसंघात प्रचार यंत्र सुरू केले होते. महाराष्ट्र काँग्रेस ने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.✍️



