बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जनगणना-२०२७ च्या तयारीला वेग; घरयादी व घरगणनेच्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

संक्षिप्त घरयादी (AHL) तयार करण्याबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. २२ : महाराष्ट्र राज्यात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घर-सूची आणि गृह जनगणना’ (House-listing and Housing Census) हे काम दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. आता लोकसंख्या गणनेसाठी घरयादी व घरगणना गटांमधून (HLBs) प्रगणक गट (EBs) तयार करणे तसेच संक्षिप्त घरयादी (AHL) तयार करण्याच्या अनुषंगाने चार्ज जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक यांचे एकत्रित प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल येथे दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी सुरेश कव्हळे प्रशिक्षणास उपस्थित होते.

जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयाकडून प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त सहायक संचालक प्रविण भगत आणि एस.आय. जी.आय. ऋषीकेश पाथरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संक्षिप्त घरयादी (AHL) तयार करण्याची कार्यपद्धती याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेतील विविध बाबी, घरयादीची अचूक नोंद, प्रगणक गटांची निर्मिती तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदार (सा.प्र.) संजीवनी मुपडे उपस्थित होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button