भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026’ चे उद्घाटन केले.

राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, केंद्रीय राज्यमंत्री श्री. प्रतापराव जाधव व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती.
शेगाव, जि. बुलढाणा (महाराष्ट्र)
भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांनी आज संत श्री गजानन महाराज यांची पावन भूमी शेगाव (बुलढाणा) येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026’ चे उद्घाटन केले. आयुष मंत्रालय व ऑल इंडिया आयुर्वेदिक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय मेळाव्यात धोरणकर्ते, संशोधक, वैद्य, शेतकरी व नागरिक एकत्र आले आहेत.
राष्ट्रपतींनी “आरोग्यम् परमं सुखम्” या उक्तीचा उल्लेख करत निरोगी नागरिक राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. आयुर्वेदासह विविध आयुष पद्धती समग्र व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देतात, असे त्यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांनी आयुर्वेद ही निसर्गाधिष्ठित वैज्ञानिक परंपरा असल्याचे सांगितले. तर केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष श्री प्रतापराव जाधव यांनी हा मेळा भारतीय पारंपरिक वैद्यक पद्धतींचा “महाकुंभ” असल्याचे म्हटले.
या प्रसंगी राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मंत्री तथा बुलढाणा पालकमंत्री श्री. मकरंद जाधव पाटील, मंत्री श्री. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांना ‘आयुर्वेदिक गौरव सन्मान’ प्रदान केला. तर आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वैद्य देवेंद्र त्रिगुणा, वैद्य राकेश शर्मा, डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. मनीषा कोटेकर, पी. एम. वारियर आणि डॉ. रामदास यांना ‘लाइफटाईम आयुर्वेदिक गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला.
उद्घाटन समारोह नंतर महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी व सर्व प्रमुख पाहुण्यांसह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ‘नॅशनल आरोग्य मेला 2026’ ला भेट देऊन विविध प्रदर्शनांची पाहणी केली व माहिती घेतली.



