बुलढाणामहाराष्ट्रसांस्कृतिक

कै.श्यामराव सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनी ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर यांचा सत्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनीधी.
तेल्हारा दि.१६: महाराष्ट्र शासन ग्रंथमित्र पुरस्कृत अकोला जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघाचे सचिव तथा तेल्हारा येथील ग्रंथालय चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते रामेश्वर पोहेकर यांना नुकताच कल्याणी क्रिडा शिक्षण संस्था अकोला च्या वतीने समता नायक पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दानापूर येथिल कै.श्यामराव सार्व. वाचनालयामध्ये वाचन प्रेरणा दिनी त्यांचा ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सदानंद मोरे, दापूरा यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर यांनी मानवी जीवनात पुस्तकाचे (वाचनाचे) महत्त्व या विषयावर काव्यरचना सादर केली तसेच रामेश्वर पोहेकर व सदानंद मोरे यांनी तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर, हिवरखेड गोर्धा बेलखेड, निंबोळी व सात्काबाद (तेल्हारा) येथील सार्वजनिक वाचनालयाला भेटी देऊन पुस्तकाचे महत्व विषद केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button