मंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा रोजगार मेळाव्यासह संतनगरी शेगाव येथील विविध प्रश्नांकडे शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी वेधले लक्ष

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे जगभरातील लोक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे येथे रोजगार मेळावा आयोजित केला तर बुलढाणा लागत असलेल्या अकोला वाशिम जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना या मेळाव्याचा नक्कीच फायदा होईल या अनुषंगाने शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना निवेदन दिले असता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड तसेच आ.संजय रायमुलकर यांचे सोबत सविस्तर चर्चा करून तारीख ठरवून लवकरच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी दिले.
यावेळी संजय अवतडे उपजिल्हा प्रमुख, संतोष डिवरे उपजिल्हा प्रमुख, देविदास घोपे उपजिल्हा प्रमुख, राजेंद्र बघे खामगाव तालुका प्रमुख, अजय पारसकर जळगाव तालुका प्रमुख, सुनील जूनारे नांदुरा तालुका प्रमुख माजी उपजिल्हा प्रमुख संतोष लीप्ते, मा. तालुका प्रमुख उमेश पाटील, गोपाल बोरसे विभाग प्रमुख, मयूर माळी ,शशी पुंडकर , पवन बानाईत, लाहुडकार ई. उपस्थित होते.



