Uncategorized

विजय देवगिरीकर अचानक पाय घसरून नदीपात्रात वाहून गेले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । शहरातील ओमनगर भागातील रहिवासी व स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालय परिसरातील दस्तलेखक विजय देवगिरीकर (५४) हे आज सकाळी ११ वाजता तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदीपात्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेबाबत समजताच तळेगावचे सरपंच मंगेश कोकाटे यांनी तेल्हारा पोलीस व तहसीलदार यांना बोलावून शोधकार्यास सुरूवात केली.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ११ वाजता सुमारास विजय देवगिरीकर व त्यांची पत्नी सौ. भारती देवगिरीकर हे तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी ते गौतमी, विद्रुपा व पुर्णा नदीच्या त्रिवेणी संगमावर आंघोळीसाठी गेले होते. नदीच्या तीरावर आंघोळ करित असताना विजय देवगिरीकर हे अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले व काही अंतरावर गेल्यानंतर ते दिसेनासे झाले. त्यावेळी नदी काठावर असलेल्या काहींनी नदीपात्रात उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती कळताच ओम नगर येथील नागरिकांनी वांगेश्वरकडे धाव घेतली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शोधकार्य सुरू होते.
विजय देवगिरीकर यांच्या पश्चात पत्नी, आईवडील, दोन मुले, भाऊ, पुतणे असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे संपुर्ण ओमनगरात शोककळा पसरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button