संपादकीय

जळगाव जागृत जनमंच झाले लोकमान्य!

जळगाव जागृत जनमंच झाले लोकमान्य!

काल तरूण भारत पेपरचा वर्धापन दिनानिमित्त आम्ही जळगाव जागृत जनमंच आमंत्रित होतो.संध्याकाळी गोलानी मार्केट मधे कार्यक्रम होता.सोबत ईश्वर मोरे, सुरेश पांडे,एड एस आर पाटील, राकेश वाघ,अजय पाटील, योगेश कदम होते . शहरातील, जिल्ह्यातील मान्यवर भेटले.राजकिय, सामाजिक मित्र भेटले.वकील, डॉक्टर प्रोफेसर इंजिनिअर, व्यापारी ,उद्योजक भेटले.तिजोरीवाले भेटले.चाबी वाले भेटले.जमीनीवरचे भेटले.भुमिगत भेटले.वेळ मिळेल तशी चर्चा केली.या गदारोळात,घाईगडबडीत सुद्धा आपल्या टीम च्या सदस्य सोबत मनोगत व्यक्त केले.काहींनी कामाचे कौतुक केले.काहींनी धाडसाचे कौतुक केले.काहींनी भेटीचे आमंत्रण दिले. शहरातील मान्यवर आपल्या जनमंच च्या सदस्यांना वेळ देऊन भेटीला बोलावतात.चर्चा करतात.जळगांव शहरातील महानगरपालिका, विधानसभा बाबत विचारविनिमय करतात.आपण सांगितले त्या धोरणांना प्रतिसाद देतात.ही आपल्या विचारांची,कामाची पोहचपावती आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागतांना राजकीय पक्ष लाखोंची अनामत मागतात.ज्यांना शक्य आहे ते देऊन उमेदवारी मिळवतात.राजकिय पक्ष त्यांना एनकेण प्रकारे निवडून आणतात.आता आपण लोकांना इतके पैसे देण्याची ऐपत आहे का?तर मग, ईतके पैसे आणण्यासाठी दारू,सट्टा,रेती, डान्सबार चालवावे लागेल.तेच केले तर आपण चांगले काम करू शकत नाहीत.जर चांगले काम होत नसेल तर कशाला लढायची निवडणूक? जळगाव शहरात चांगली माणसे आहेत.ज्ञानी माणसे आहेत .,प्रामाणिक माणसे आहेत.पण गैरमार्गाने, अवैध धंदे करून पैसा कमवत नाहीत.म्हणून राजकीय पक्ष उमेदवारी देत नाहीत.म्हणून आपण आपल्या मार्गाने निवडणूक लढू.बिनपैशांची.कमी पैशांची. बिनपैशांची निवडणूक लढण्यासाठी आपली ओळख मतदारांना झाली पाहिजे.तुम्ही कोण?काय काम करता?चुला कसा पेटतो?किती ज्ञान आहे?किती हिंमत आहे?काय करू शकता?यांची ओळख देणे आवश्यक आहे.म्हणूनच शहरातील प्रभाग मधे सभा,बैठका, चर्चा, संपर्क अभियान चालवणे आवश्यक आहे.जर ऐनवेळी उमेदवारी केली तर लोक विचारतील, तुम्ही कोण रे भो ? आतापर्यंत कांग्रेस चे प्राबल्य होते.ते म्हातारे होऊन लुळे पांगळे झाले आहेत. शिवसेनेचे आधे इधर,आधे उधर झाले आहेत .राष्ट्रवादीचे बाळंतपण होऊन पुतण्याचा जन्म झाला आहे.भाजपने सराईत लोकांना पक्षात घेतले .त्यांनी नेत्यांचे लंगोट घेऊन पळाले.नेते पार नागडे झालेत.आता चिंध्या जमा करून अब्रू झाकत आहेत.पुढे गुंडाळले तर मागचे उघडे आणि मागे झाकले तर पुढे नागडे.अशा परिस्थितीत जनता नवीन नेते शोधत आहेत.जे मतांचे पैसे वाटणार नाहीत.जे रस्त्याचे डांबर पळवणार नाहीत.जे सिमेंट चोरणार नाहीत.जे गटार गिळणार नाहीत.जे कचरा खाणार नाहीत.जे सफाई साफ करणार नाहीत. जळगाव शहरातील अभिजात वर्ग, जो बुद्धिमान, ज्ञानी नीतिमान कष्टाळू आहे तो भयग्रस्त होता.त्याचे भय आपण कमी करीत आहोत.कोणी खंडणी मागणार नाही.कोणी चाकू सुरी पिस्तूल दाखवणार नाही.दुकानात शिरून धमकी देणारं नाही.एमआयडीसी कामगारांना फितवणार नाही.आधिकाऱ्यांना थप्पड मारणार नाही.अशी व्यवस्था हवी आहे.ती व्यवस्था आपण देणार आहोत.अशी आशा बाळगून आहेत. सर्वात महत्त्वाचे, जळगाव जागृत जनमंच मधे कोणीही अडाणचोट नाही.त त फ फ नाही .गण मन नाही .इंदूर भोपाल नाही नाही.सर्वच उच्चशिक्षित आहेत.रिटायर अधिकारी आहेत.ज्यांनी लुटमार केली नाही.राजकारण हा धंदा नाही.त्यामुळे चांगली माणसे ,चांगले विचार,चांगले प्रशासन देतील. जळगाव जागृत जनमंच मधे अवैध धंदे करणारे कोणी आढळले तर आम्ही सोबत घेत नाहीत.अतिक्रमण करू नका.कर्ज बुडवू नका.अब्रू विकू नका.लोकांना फसवू नका.जर तुमचा चुला प्रामाणिकपणे पेटत असेल तरच आमच्या सोबत या. ती ददात असेल तर आधी तिकडे लक्ष द्या.आम्ही तुम्हाला मिळवून देऊ,या भ्रमात राहू नका. ते आम्हाला जमत नाही.तसा स्वभाव नाही.असा आमचा संदेश आहे.कटाक्ष आहे. आजपर्यंतच्या वाटचालीत आपण बरेच पुढे आलेलो आहोत.लोकांच्या मनात स्थान निर्माण केलेले आहे.तर मग, विश्वासाने, प्रामाणिकपणे बदल घडवून आणू शकतो. जळगाव शहरात ८० टक्के चांगली माणसे आहेत.पण बायको पोरं,घरदार , नोकरी, व्यापार उदीम सांभाळताना फुरसत मिळत नाही.त्याचा गैरफायदा बदमाषांनी घेतला आहे.राजकाणातून सत्तेत शिरकाव केला आहे.चोरी,लांच, कमीशन चा सुळसुळाट झाला आहे.त्याचे परिणाम आपण ८०टक्के नागरिक भोगत आहोत.हे आता थांबवायचे आहे.त्रस्त लोक आता खांदेपालट, सत्तापालट करू इच्छित आहेत.फक्त भाकरी नव्हे, तवा फिरवायचा आहे. तर मग,या सोबत.मैदानात. काळ तुम्हाला बोलवत आहे…. शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button