जळगावा जिल्हामहाराष्ट्र

एकनाथराव खडसे अमृत महोत्सवः अखंड हरिनाम सप्ताहास भक्तीमय वातावरणात प्रारंभ

राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (अमृत महोत्सव) श्रीक्षेत्र कोथळी येथे ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा’ आज बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. हा सोहळा २६ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्री संत मुक्ताई जुन्या मंदिराच्या सानिध्यात पार पडत आहे.

ग्रंथ दिंडीने सप्ताहाची मंगलाचरण सुरुवात
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आज सकाळी ठीक ८.३० वाजता श्री संत मुक्ताई जुने मंदिर, कोथळी येथून भव्य ग्रंथ दिंडी मिरवणूक निघाली. ही दिंडी वाजत-गाजत श्री सोमेश्वर मंदिर (कार्यक्रम स्थळ) पर्यंत पोहोचली. मिरवणुकीनंतर दीपप्रज्वलन करण्यात आले असून, त्यानंतर श्रीमद्भागवत कथा व प्रवचनास अधिकृत प्रारंभ झाला आहे. या पहिल्या दिवशी ह.भ.प. रमेश महाराज आडविहिरकर (प्रवचनकार) आणि ह.भ.प. बाळूजी पाडोळे महाराज (कीर्तनकार) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांची व वारकऱ्यांची उपस्थिती
श्रावण शुक्ल १३ पासून सुरू झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. या मंगलमय सोहळ्यास सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आणि श्री संत मुक्ताई चरित्रकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे, सौ. मंदाकिनी एकनाथराव खडसे, श्रीमती रक्षा निखिल खडसे, सौ.शारदाताई गिरीश चौधरी, सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब पाटील, ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी बांधव व हजारो भाविक उपस्थित होते.

सप्ताहात दररोज काकडा आरती, विष्णु सहस्रनाम, मुक्ताई चरित्र वाचन, संगीत श्रीमद् भागवत कथा आणि सायंकाळी हरिपाठ व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button