बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथे युवासेनेची आढावा बैठक; ‘गाव तिथे शाखा’ स्थापन करण्याचा जिल्हाप्रमुखांचा संकल्प

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज, बुधवार दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृहात (रेस्ट हाऊस) युवासेना शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.ही बैठक युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

आगामी काळात युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि ‘गाव तिथे युवासेना शाखा’ स्थापन करून संघटनेचा विस्तार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विस्तृत सूचना केल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे आणि युवासेना तालुकाप्रमुख नितेश देशमुख यांनी पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

या बैठकीला शिवसेना शहरप्रमुख अजय शिवरकर, माजी उपाध्यक्ष पवन झोरे, योगेश मिसाळ, नागेश प्रहाड, विशाल उखळकर यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button