जळगावा जिल्हासंपादकीयसामाजिक

असमतोल समाचाराचा दुष्परिणाम!

असमतोल समाचाराचा दुष्परिणाम!

एक घटना घडली.लग्न झाले.त्यात कोणी आमदार खासदार मंत्री आला .तर पेपर मधे लग्न नाही, नेत्यांची बातमी बनली. एक घटना झाली.माणूस मेला.आमदार खासदार मंत्री ने सांन्तवन केले.तर पेपरमधे मरणाची नाही सांन्तवन ची बातमी बनली. एक अपघात झाला.दवाखान्यात नेला.आमदार खासदार मंत्री भेटायला आला.तर पेशंटची नाही भेटणाऱ्याची बातमी बनली. मंत्री ने कर बुडविला.त्याची बातमी बनलीच नाही.पण ज्याने आक्षेप घेतला,त्याला मंत्रीच्या मैत्रीणीने यौन आवाहन दिले,ती बातमी बनली. आपल्या आमदाराने भ्रष्टाचार केला.असे पत्रकार परिषदेत सांगितले.ही बातमी बनलीच नाही.म्हणून पक्षाने बोलणाऱ्याला डच्चू दिला.तर पेपरमधे बातमी दिली,म्हणे पक्षातून हकालपट्टी केली. जळगाव महापालिकेत बोगस लोकशाही दिन झाला.त्याची बातमी कोणीच बनवली नाही.पण आक्षेप घेणाऱ्यांनी धक्काबुक्की केली ,त्याची बातमी सर्वच पेपरमधे गाजली. जळगाव महापालिका निवडणुकीत एक गुंड उमेदवार होता.त्याची हागली मुतलींची बातमी दिली.पण गुंडाला एका पुंडाने आवाहन दिले.याची बातमी बनलीच नाही. येथे बातमीदार, पत्रकार असमतोल वागले.तोल गेला.कशामुळे?एका पारड्यात जास्त बंडल टाकल्यामुळे.जर एका पारड्यात बंडल टाकल्याने पोलिस, तहसीलदार, कलेक्टर न्यायाधिश यांचा तोल जाऊ लागला तर काय होईल?सर्वच प्रशासन ठप्प होईल.तसाच तोल बातमीदार पत्रकार यांचा गेला आहे.लिकरकिंग,रेतीमाफिया डान्सबारवाला,सट्टावाला,चाकू सुरी पिस्तूल वाला यांनी पारड्यात बंडल टाकले की त्यांचे फोटो, बैनर, स्तुती पेपरमधे येते.सामान्य लोकांना रोज रोज असे पाहून वाचून गैरसमज होतो की,हाच माणूस महान आहे.हाच माणूस दयावान आहे.हाच माणूस दाता आहे.हाच माणूस नेता आहे.याचा परिणाम झाला.नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा,लोकसभेत बदमाष माणसे निवडून आलीत.त्याच बदमाषांनी जनतेच्या ताटातील चोरले.जुलुम केला.आता तेच बदमाष आता बातमीदार, पत्रकार यांच्या जिवावर उठले. ही धोक्याची सुचना आम्ही आधीच दिली होती.बदमाषांना मोठे केले की,काही काळ तुमचा आर्थिक लाभ होईल.पण हा बकासुर एकाला मारून थांबत नाही.हा बकासुर एकाला खाऊन थांबत नाही.तो त्याच बातमीदार पत्रकार यांना खाऊ शकतो.खाणारच.या आधीही खाल्ले.आता ही खाल्ले.पुढेही खाणारच.कारण नीतीचा,मतीचा तराजू झुकला.असमतोल झाला.कौरवांना मोठे करणारे धृतराष्ट्र ,भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य,कर्ण यात बरबाद होणारच.समाजाचा समतोल राखण्यासाठी सत्तेचा समतोल राखावा लागतो.सत्तेचा समतोल राखण्यासाठी संपत्तीचा समतोल राखावा लागतो.संपत्तीचा समतोल राखण्यासाठी नीतीचा समतोल राखावा लागतो.नितीचा समतोल राखण्यासाठी मतीचा समतोल राखावा लागतो.आणि ही मती तर तुमच्या आमच्या डोक्यात आहे.आधी तिचा समतोल राखणे आवश्यक आहे. मी या सामाजिक ,राजकीय, प्रशासकीय कुरूक्षेत्रावरील सैनिक आहे.या युद्धातील योद्धा आहे.मी खडसे,भुसे,शिंदे,भोळे, गुलाबराव,महाजन यांना काय म्हणालो,ती पेपरमधे कधीच बातमी बनली नाही.पण ते मला काय बोलले यांची मात्र हेडिंगला बातमी येते.कारण तराजूत बंडल टाकल्याने समाचाराचा समतोल गेला आहे.हा समतोल राखला नाही तर माजलेला बकासुर एकेकाचा बळी घेणारच.आम्ही सैनिक आहोत.आम्ही योद्धा आहोत .आम्ही लढता लढता मरू.पण जे खाता खाता मरतील त्यांचा समाचार कसा घेणार? महाभारतातील संजयने हस्तिनापूरच्या धृतराष्ट्राला चुकीची माहिती दिली.कुरूक्षेत्रावर कौरवांची सरसी सांगितली.पांडवांची बलस्थाने सांगितली नाहीत.तसेच महाराष्ट्रातील संजय ने मुंबईतील धृतराष्ट्राला चुकीची माहिती दिली.सैनिक मैदान सोडून पळाले.शत्रूच्या तंबूत लपून बसले.हे सांगितले नाही.येथे समाचाराचा समतोल राखला गेला नाही.सत्तेचा समतोल कसा राखणार? सैनिकांच्या पारड्यात बंडल टाकल्याने त्यांच्या मतीचा तराजू झुकला.ते सैनिक समाजाचा समतोल कसा राखणार?

… शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button