विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना जलरोधक आणि छत्र्यांचे वाटप.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी शारदा पवार
दिनांक.02/07/2026
देऊळगाव राजा : गेल्या काही वर्षापासून विश्व हिंदू परिषद विविध आयामाच्या माध्यमातून आषाढी वारीतील वारकऱ्यांना पायी चालताना सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे,संत ज्ञानेश्वर माऊली श्रीक्षेत्र आळंदी,जगद्गुरु संत तुकोबाराय श्रीक्षेत्र देहू,संत सोपानदेव श्री क्षेत्र सासवड, श्री निवृत्तीनाथ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इत्यादी आषाढी वारीतील या प्रमुख पालख्यांमध्ये सहभागी विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी गेल्या काही वर्षापासून रुग्णवाहिका,डॉक्टर्स,औषधी व स्वच्छ पाण्याचे टँकर विश्व हिंदू परिषद सेवा विभागाच्या माध्यमातून सेवा देत आहेत, निर्मल वारी स्वच्छ वारी या उपक्रमांतर्गत या सर्व मोठ्या दिंड्यांसोबत फिरते स्वच्छालय सुद्धा विश्व हिंदू परिषदेने यापूर्वी उपलब्ध करून दिले आहेत आषाढी वारी संपल्यानंतर पंढरपूर नगरीत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने व्यापक प्रमाणात चंद्रभागेचा परिसरासह मंदिर व पालखी मार्गावर स्वच्छता अभियान सुद्धा राबविल्या जात आहे,यावर्षी या सर्व पालख्यामध्ये सहभागी वारकऱ्यांना पावसाच्या पाण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून जलरोधक(रेनकोट)आणि छत्रीचे वाटप विश्व हिंदू परिषद धर्मयात्रा विभागाच्या वतीने करण्यात आले त्याच अनुषंगाने आषाढी वारी सेवा उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना जलरोधक(रेनकोट )आणि सहभागी दिंड्यातील शेकडो विणेकर्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले,गुरुवार दिनांक २ जुलै रोजी विदर्भ प्रांतामधील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषद क्षेत्र सहमंत्री(धार्मिक पुंज) तथा क्षेत्र संयुक्त मंत्री संजय जी मुद्राळे, विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री(धार्मिक पुंज) गणेश जी काळकर, विश्व हिंदू परिषद बुलढाणा जिल्ह्य मंत्री माधवजी धंदाळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहधर्माचार्य प्रमुख नागनाथ जी बोनगरगे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत युवा संत प्रमुख समीरजी पायगुडे जिल्ह्यातील देऊळगाव मही खंड अध्यक्ष परमेश्वर गुडघे, खंड मंत्री रवींद्र तुपकर, बजरंग दल खंड संयोजक संभाजी शिंगणे यांच्यासह देऊळगाव मही खंडातील विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गावहिनी च्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



