बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शिवसेना तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या १४ मागण्या मान्य; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह सर्व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून आमरण उपोषणाची सांगता,

शिवसेना तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या १४ मागण्या मान्य; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह सर्व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून आमरण उपोषणाची सांगता,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :-प्रशांत चव्हाण

बुलढाणा 🙁 दि. 2 जुलै) आ.श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा; सकारात्मक तोडगा, शिवसेनेच्या आंदोलनाला मोठे यश,
बुलढाणा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अमली पदार्थांची खुलेआम विक्री, अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना, गावठी दारू व्यवसाय, वाळू तस्करी, गोमातेची तस्करी, जुगार अड्डे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा बिघडलेला प्रश्न याविरोधात शिवसेना बुलढाणा जिल्हा आणि धर्मवीर युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची दि. २ जुलै २०२६ रोजी यशस्वी सांगता करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुरेश कव्हळे ,तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शिवसेना तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या १४ प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री. सुरेश कव्हळे यांच्या हस्ते सर्व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
हे आंदोलन शिवसेना आणि धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले होते. धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, युवानेते तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग किसनसिंग राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाला सर्वसामान्य नागरिक, विविध सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी, युवक तसेच अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
उपोषणामध्ये बुलढाणा शहर व जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे, हातभट्टी दारू व्यवसाय, वाळू तस्करी, जुगार अड्डे, गुटखा, गांजा, बटन कॅप्सूल व इतर अमली पदार्थांची खुलेआम विक्री, अल्पवयीन मुलांमध्ये वाढते व्यसन, अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना, दुचाकी व चारचाकी चोरी, ऑनलाइन फसवणूक, परराज्यातून देशी कट्टे, बंदुका व तलवारींची तस्करी, गोवंश चोरी, महिलांची छेडछाड, तसेच वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींसह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनेक गंभीर प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या सर्व विषयांवर तातडीने प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संजय गायकवाड यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेत मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्हाधिकारी श्री. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे तसेच गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा घडवून आणण्यात आली. या चर्चेनंतर शिवसेना तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या १४ मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुरेश कव्हळे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या स्वाक्षरीचे लेखी आश्वासनपत्र धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग किसनसिंग राजपूत, नगरसेवक बबलू मावतवाल, पाणीपुरवठा सभापती नयन प्रकाश शर्मा तसेच माजी नगरपालिका उपाध्यक्ष व नगरसेवक विजयजी जायभाये यांच्याकडे अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री. सुरेश कव्हळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर सर्व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून आंदोलनाची अधिकृत सांगता करण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते विजयजी अंभोरे, शिवसेना शहरप्रमुख आशिष जाधव, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, नगरपालिका उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. संग्राम पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसान सेना, अल्पसंख्याक सेना, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, आजी-माजी शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सभापती, उपसभापती, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी सांगितले की, शासनाने १४ मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले असले तरी त्या मागण्यांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास किंवा मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा आमरण उपोषण छेडण्यात येईल. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनामुळे शिवसेनेने बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर जनआंदोलन उभे करून शासनाकडून लेखी आश्वासन मिळविण्यात यश मिळविले, अशी भावना उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी व्यक्त केली. उपोषणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सर्व १४ मागण्यांची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवसेना आणि धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या वतीने आणखी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button