महाराष्ट्र

शेगाव बाजार समितीसाठी होणार आज मतदान(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसप्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

९९४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

शेगाव, ता. २९: तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या (ता. ३०) मतदान होणार आहे. सहकार पॅनल विरुद्ध शेतकरी विकास पॅनल मध्ये ही लढत असून, संचालक आहेत. पदाच्या १८ जागांसाठी यंदा ९९४ अशी आहे मतदार संख्या मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत शेठ ग. भी. मुरारका महाविद्यालयात ही मतदान प्रक्रिया पार पडेल.

खामगाव येथे बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या दोन गटातील हाणामारीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून देखील या सर्व घटना- घडामोडींवर करडी नजर राहणार आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात

आलेला आहे. निवडणूक झाल्यानंतर लगेच संध्याकाळी ४.३० वाजता मतमोजणी सुरू होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बी. एन. कोल्हे काम पाहत

सहकारी संस्था गटात ११ जागांसाठी ४०५ मतदार, ग्रामपंचायत गटातून चार जागांसाठी ३८८ मतदार, हमाल व मापारी गटाच्या एका जागेसाठी १२० मतदार, व्यापारी मतदार संघाच्या दोन जागांसाठी ८१ असे एकूण १८ जागांसाठी ९९४ मतदार मतदान करणार आहेत. शेगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ३२ सहकारी संस्था तसेच ४६ ग्रामपंचायती येतात. या ठिकाणी १८ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button