हवामान विभागाने पुन्हा दिला धोक्याचा इशारा; पुढचे ५ दिवस पुन्हा अवकाळीची शक्यता…

आज आणि उद्या गारपीट होणार! शेतकऱ्यांना दिलेला महत्वाचा सल्ला वाचा.
✒️ बुलडाणा ; सध्या एप्रिल सुरू असला तरी सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असल्याने नेमका ऋतू कोणता असा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात सातत्याने ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. नुकसानी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. जीवितहानी देखील झाली. आता तरी अवकाळी पाऊस थांबेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून असताना पुन्हा हवामान विभागाने धोक्याची सूचना दिली आहे. आज,२५ एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील ५ दिवस पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज व उद्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच आजपासून २९ एप्रिल पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. आज २५ आणि उद्या २६ एप्रिल रोजी बहुतांश ठिकाणी, २७ एप्रिल ला काही ठिकाणी तर २८ व २९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



