Uncategorized

वि. तहसीलदार समाधानजी सोनवणे तेल्हारा यांचे शेतकऱ्यांना आवाहन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा |
तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तेल्हारा तालुक्याचे वि. तहसीलदार समाधान सोनवणे यांनी याद्वारे आवाहन केले आहे. कि येत्या दि.१५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी करून घ्यावी जेणे करून आपल्याला मिळणाऱ्या कोणत्याही लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही.

२०२४ च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास दि.१ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून दि.१५ सप्टेंबर २०२४ पर्यंत शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी करता येणार आहे.
ई-पिक पाहणीचे शेतकऱ्यांसाठी पुढील फायदे आहेत. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पिकासाठी एकच संकेतांक क्र. निश्चित करण्यात येत असल्याने गाव, तालुका, जिल्हा, विभाग निहाय कोणत्याही पिका खाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे त्यामुळे ई-पीक पाहणी जरुरीचे आहे.
शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उताऱ्यावर नोंदवणं याला ई-पीक पाहणी करणे होय. राज्यात मागील ४ वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हितास्तव राबवत आहे.

कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे कि तुषार सिंचन, ठिबक योजना इत्यादी लाभ खातेधारकांना अचूक रित्या देणे सहज शक्य होणार आहे. आधारभूत किंमतीवर कापूस, हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पनाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार व झालेल्या नुकसानाची भरपाई अदा करने सुद्धा सहज शक्य होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
तरी सर्व शेतकरी बंधुनी ई-पीक पाहणी येत्या दि. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत करून घेण्याचे आवाहन तेल्हारा तालुक्याचे वि. तहसीलदार मा.समाधान सोनवणे यांनी केले आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button