Uncategorized

ईपीएस ९५ निवृत्ती वेतनधारकांचा प्रश्न सोडवावा

सैयद गुलाब भाई यांची मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव – ईपीएस ९५
पेन्शनवाढीसाठी गेली सहा वर्षे जंतरमंतर, दिल्ली येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व त्यांचे सहकारी उपोषणासाठी बसले आहेत. तसेच बुलढाणा येथे गेली सहा वर्षे त्या विभागातील पेन्शनर उपोषण आंदोलन करत आहेत. याची नोंद सर्व ईपीएस ९५ निवृत्ती वेतन धारकांनी घेणे गरजेचे आहे. बुलढाणा व जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या वयोवृद्धांकडे केंद्र सरकार कधी लक्ष देणार? असा सवाल सैयद गुलाब भाई यांनी केला.

आम्हाला ५० हजार पेन्शन नको. आमची हक्काची ६ हजार ५०० अधिक महागाई भत्ता द्यावा, ईपीएस ९५ फडांत सर्व निवृत्तीधारकांचे तीन लाख कोटी शिल्लक आहेत. त्याचे ५० हजार कोटी व्याज महिन्याला केंद्र सरकारला मिळते. पैकी १३ हजार कोटी निवृत्ती धारकांना सरकार पेन्शन स्वरूपात देते. ही तुटपुंजी १५०० ते दोन हजार आहे. एकूण ७८ लाख पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन सरकार देते. हाच काय ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

७८ लाख पेन्शनधारकांपैकी ७२ टक्के पेन्शन धारकांचे वय 70 वर्षांच्या पुढे आहे. मग त्यांना लाभ किती वर्षे मिळणार. ईपीएस ९५ चे कार्यरत सभासद सात कोटी आहेत. मग त्यांनाही पेन्शन वाढणार आहे. त्यांनीही आंदोलनात उतरले पाहिजे, अशी अपेक्षाही सैय्यद यांनी व्यक्त केली आहे. सर्व ईपीएस ९५ च्या ७८ लाख पेन्शन धारकांच्या शिल्लक रकमेचे व्याज सरकारने पेन्शन स्वरूपात द्यावे, अन्यथा आमची रक्कम आम्हाला परत द्यावी अशी सर्व पेन्शनधारकांची मागणी असल्याचेही सैयद यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button