आज आणि ऊद्या तेल्हारा शहरात होणार ८ वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.२४ ; महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ,शिक्षक साहित्य संघ (महा.) व मासिक शिक्षकमत परिवार द्वारा आयोजित ८ वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन निसर्गवासी भाई प्रभाकरराव सावरकर साहित्यनगरी ,स्व.बाप्पूसाहेब ढाकरे विचारपीठ स्व.अनंतराव भागवत मंगल कार्यालय तेल्हारा जि .आकोला येथे शनिवार दि.२४ फेब्रुवारी व रविवार दि .२५ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडत आहे .
प्रा.डॅा.सदानंद देशमुख बारोमासकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक यांचे अध्यक्षतेत संपन्न होत आहे. दि. २४ फेब्रुवारी ला संमेलनाचे उद्घाटक म्हणून ९७ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा.डॅा.रविद्र शोभणे हे असून स्वागताध्यक्ष अरविंद गिर्हे आहेत तर आ.सुधाकरराव अडबोले नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ आ.धिरज लिंगाडे अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ , प्रा.एल बी पाटील रायगड सदस्य म.रा.सा.सं.मंडळ मुंबई ,ॲड गजाननदादा पुंडकर उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, केशवराव मेतकर उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती ,सुरेशदादा खोटरे कार्यकारी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था ,संगिताताई अढाऊ जि.प.अध्यक्षा अकोला ,मायाताई सं.नाईक सभापती शिक्षण व आरोग्य जि.प. आकोला ,प्रा.डॅा.गोविंद गायकी प्रसिद्ध कवी यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. ग्रंथदिडीने सुरू होणाऱ्या सोहळ्यात शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी,सौ.मालती देशमुख गोंडचर यांच्या अप्रूप ,श्रीमती जया सु.देशमुख यांच्या व्यासंग ,प्रा.डॅा.अनघा सोमवंशी सोनखासकर यांचा अनुग्रह चारोळी संग्रह राजेद्र क.भटकर यांचा जातीचं मढं जावो जयदिप सोनखासकर यांचा आयुष्य पेलतांना ,सौ.प्रतिभा भा.शिरभाते यांच्या कटूसत्य यांचा वैचारिक लेख संग्रह सुनिता बकाल तळोकार यांचा संगिनी काव्यसंग्रह प्रकाशन समारंभ होणार असून जीवनगौरवं पुरस्कार उद्घाटकाचे मनोगत अध्यक्षीय भाषणाने पहिले सत्र संपून दुपारी प्रा ञानेश्वर हंडरगुडीकर ,प्रा.कांचन पांडेय पाटणा बिहार ,निलेश घुगे,वाशिम,हरिष ससनकर चंद्रपुर,डॅा.सुशिल प्रकाश चिमोरे लातुर ,प्रा.डॅा.गणेश चव्हाण नागपूर ,प्राचार्य गोपाल ढोले , शरदचंद्र बिरकड रिद्धपुर,यांचा परिसंवाद तर विलास सिंदगीकर जळकोट ,अंबादास केदार उदगीर, सुषमा इसळ अमरावती, प्रा.डॅा.अनघा सोमवंशी आकोला ,विनोद तिरमारे अमरावती यांचे कथाकथन, डॅा.प्रतिमा इंगोले यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सांयकाळी गायनकट्टा रंगणार असून लोककवी विठ्ठल वाघ यांचे अध्यक्षतेत प्रा.प्रभाकरराव कोलखेडे यांचे उपस्थितीत कविसंमेलन भरणार आहे. रविवार दि.२५ ला डॅा.विठ्ठल वाघ यांच्या प्रगट मुलाखती ने संमेलनाचे सातवे सत्र भरणार असून गझल मुशायरा चंद्रशेखर भुयार यांचे सतीश दराडे, प्रियंका गिरी , संदिप वाकोडे ,अमोल गोंडचवर , निलेश कवळे यांचे प्रमुख उपस्थितीत रंगणार आहे.
नवे सत्र हे मुक्तसंवाद असून ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी राजश्री कोलखेडे सोनखासकर उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांचा होणार असून दुसरे कवी संमेलन प्रा.डॅा.गोविंद गायकी , प्रा.राजेद्र काळे यांचे उपस्थितीत होणार आहे.
समारोप तथा खुले अधिवेशन दै .लोकमत आकोला आवृत्ती कार्यकारी संपादक किरणजी अग्रवाल यांचे अध्यक्षतेत पिंपरी चिंचवड सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदळे यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे .महाराष्ट्र शासनाचा राम गणेश गडकरी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा.डॅा.रावसाहेब काळे यांचा विशेष सत्कार या प्रसंगी होणार आहे .तसेच नि. भाई प्रभाकरराव सावरकर जीवन गौरव पुरस्कार.
स्व. भाई प्रभाकरराव सावरकर, श्रीमती कमलताई प्रभाकरराव सावरकर,
श्री. सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे, प्रल्हादराव जामोदे, प्रा. शोभाताई रोकडे ,स्व. विठ्ठलराव उंबरकर, मा.प्राचार्य अण्णासाहेब ढोले, डॉ.विठ्ठल वाघ, डॉ. भास्करराव मुळे, डॉ. प्रतिमा इंगोले, प्रा. प्रभाकरराव कोलखेडे, गजाननराव यादगिरे, रामदासजी खोडके सर, प्रल्हादराव ढोकणे, प्रल्हादराव गावत्रे, विनोद सोनी, किरण जी अग्रवाल, मनोहरराव राऊत , सुरेशराव शिंगणारे, वासुदेवराव नळकांडे, किशोरभाऊ अनंतराव भागवत, प्रकाश शंकरराव राऊत, वासुदेव नासणे .असे स्वागताध्यक्ष अरविंद गिर्हे, तुळशीदास खिरोडकार ,चारूदत्त मेहरे ,शिवराजे जामोदे, रविंद्र वर्गे, संघर्ष सावरकर , अजय पाटील , शाम पाठक, चंद्रशेखर महाजन, स्वप्ना कराळे ,रविंद्र टोहरे , आशिष सदाफळे ,हेमलता नेमाडे, विठ्ठल दाने ,शंकरराव बहाकर ,राजेश गोमासे, सुनिता कोरडे , सुनिता काकड हे कळवितात. या कार्यक्रमाचे सह .आयोजक शिक्षक साहित्य संघ शाखा तेल्हारा जिल्हा अकोला.



