सामाजिक

खेर्डा येथील मुख्याध्यापकाला मारहाणीच्या निषेधार्थ मुकमोर्चा शेगांव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव, ता. ३ : शेगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा खेर्डा येथील मुख्याध्यापक रमेश कडू हे शालेय कामकाजावर व्यस्त असतांना गावातील व्यक्तीने कोणतेही 3 कारण नसतांना वाद घालून भ्याड हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ शेगाव, संग्रामपूर येथे कार्यरत शिक्षकांनी (ता.३) मुक मोर्चा काढून शिक्षक समन्वय समितीने मोर्चा काढला.

सदर निषेध मूक मोर्चा पंचायत समितीपासून शहरातील गांधी चौक मार्गे काढण्यात येऊन तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अंनतराव वानखडे, दिलीप बळी, प्रविण कात्रे, सुनिल घावट, विजय टापरे, नवल पहूरकर, अमृतराव वानरे, प्रशांत नागे, शकीलसर यांनी भाषणातून शिक्षकांवर

एक मोर्चा

शेगाव मुकमोर्चात सहभागी शिक्षक, शिक्षिका,

होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व विनाकारण होणाऱ्या खोट्या आरोपांविरूद्ध निषेध व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी दोषी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केले. भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकाविरूध्द जलंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून, असे हल्ले करणाऱ्यांवर

विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर हल्ले ८८ होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना संरक्षण मिळावे यासाठी शिक्षकांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा असणे गरजेचे आहे. जेणेकरून मुख्याध्यापक व । शिक्षकांवरील हल्ले कमी होतील.

  • अनंतराव वानखडे, – शिक्षक नेते

कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये महिला शिक्षिका व शिक्षकांनी बहुसंख्येने सहभागी होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button