प्रभु श्रीराम यांची ‘महाआरती’ भक्तिमय वातावरणात संपन्न, कुणबी समाज संघटना तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने महाआरतीचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.२२ ; तेल्हारा शहरामधील श्री संत तुकाराम महाराज चौक येथे कुणबी समाज संघटना तथा महिला कुणबी समाज संघटना तेल्हारा शहर व तालुका यांच्या वतीने मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामांचा अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने तेल्हारा शहरात महाआरती चे आयोजन करण्यात आले होते . प्रभू श्रीराम यांच्या महाआरतीचे आयोजन असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात ,उत्साहात संपन्न झाले.
सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र
अयोध्या येथे प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन केला होता या सोहळ्याचे अवचित्त साधून तेल्हारा शहरामध्ये श्री संत मोतीराम बाबा भजन मंडळ .तेल्हारा यांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते अतिशय भक्तिमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराज व प्रभू श्रीरामचंद्र यांची महाआरती व यानंतर प्रभू श्रीरामांचे परम भक्त हनुमान यांचा हनुमान चालीसा पठण करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दर्शन घेतले व प्रसाद ग्रहण केला. हा कार्यक्रम कुणबी समाज तालुकाध्यक्ष संदीप बाळकृष्ण खरोडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला या कार्यक्रमाकरिता इतर समाजातील सर्व राजकीय मंडळी ईतर पक्षातील महिला व पुरुष पदाधिकार्यांनी आवर्जून हजेरी लगावली होती. यावेळी तेल्हारा शहरातील प्रसिद्ध असलेले श्री संत मोतीराम बाबा भजनी मंडळाचे बालू भाऊ सोळंके ,तुषार कवळे ,नागोराव ठाकरे ,माहोरे बंधू , प्रवीण नायसे , किशोर इंगळे ,संजय रामेकर ,मुऱ्हेकर बंधु , संतोष दुतोंडे व शहरातील असंख्य भाविकं तसेच हिंदू धर्मातील नागरिक बंधु व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.✍️



