सामाजिक

डॉ. उल्हास पाटील काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

जळगाव खान्देश प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संघटन व प्रशासनाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे कारवाईचे पत्र तिघांना पाठविण्यात आले आहे.

डॉ. उल्हास पाटील यांची मुलगी डॉ केतकी पाटील भाजपच्या संपर्कात असून भाजपकडे वाढता कल तसेच गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या घडामोडी लक्षात घेता केंद्रीय कार्यकारिणीकडे प्रदेश कार्यालयाकडून अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार २२ जानेवारी रोजी तिघांना निलंबित करण्यात आले.

डॉ. केतकी पाटील या लोकसभेत भाजपच्या उमेदवार असतील असे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी वारंवार जाहीर केले. त्यासंदर्भात वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रकाशित झाल्या. त्याशिवाय भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांची दिल्लीत भेटही घेतली होती. याची पक्षाने गंभीर दखल घेत विस्तृत अहवाल श्रेष्ठींकडे पाठविला होता. गेल्याच आठवड्यात पक्षाची जाहिर झालेली जिल्हा कार्यकारिणीही स्थगित करण्यात आली होती. डॉ. केतकी पाटील यांच्यासोबत काँग्रेसचा मोठा गट भाजपात जाणार असल्याच्या शक्यतेने ही कार्यकारिणी स्थगित केल्याचे बोलले जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button