बुलढाणामहाराष्ट्र

तळेगाव डवला ,जिल्हा परिषद शाळेमध्ये आऊसाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदजी यांची संयुक्त जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तळेगाव डवला दि.१२ ; तेल्हारा तालुक्यातील
तळेगाव डवला जिल्हा परिषद शाळेमध्ये शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी आऊसाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदजी यांची संयुक्तरीत्या जयंती साजरी करण्यात आली . सर्वप्रथम तळेगांव डवला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सचिन इंगळे सर यांनी दीप प्रज्वलन करून माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन त्यांना त्रिवार अभिवादन केले. याप्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था तेल्हारा तालुका अध्यक्षा तथा प्रहार महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ संध्याताई उद्धवराव ताथोड ,विनायक नागरे सर ,सुभाष दांडगे सर व जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी यांनीही पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी सुभाष दांडगे सर यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडवले हे आपल्या भाषणातून विशद केले तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या काहि विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज ,स्वामी विवेकानंद जी यांच्या जीवनावर भाषण केले व त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून जय जिजाऊ-जय शिवराय व स्वामी विवेकानंद की जय असा जयजयकार करत त्यांना त्रिवार अभिवादन करुन जयंती साजरी केली . यावेळी शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी ,कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button