बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हारा द्वारा आयोजित दिमाखदार सत्कार सोहळा संपन्न


जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हारा द्वारा आयोजित अकोला जिल्ह्यातील सकल कुणबी समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्षाचा दिमाखदार सत्कार सोहळा भागवत मंगल कार्यालय येथे अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वरजी फुंडकर होते तर उदघाटक म्हणून अदिती अर्बनचे सुरेशजी देवकर होते तर विचारपीठावर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अकोला काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रकाशजी वाकोडे, अंदुरा ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक प्रशांतजी वराळे (नानाभाऊ )कुणबी समाज विकास मंडळ अकोल्याचे अध्यक्ष डॉ. बाबुरावजी शेळके, अ. भा. कुणबी समाज मंडळ अकोल्याचे सचिव डॉ. गजाननराव वाघोडे, हिवरखेडच्या नगराध्यक्षा सौ. सुलभाताई दुतोंडे, ऍड. चंद्रशेखर बहाकर यांची उपस्थिती होती. यावेळी हिवरखेडच्या नगराध्यक्षा सौ. सुलभाताई रमेशजी दुतोंडे, तेल्हाऱ्याच्या महिला व बालकल्याण उपसभापती सौ. रुपालीताई रामेश्वर हागे, हिवरखेडच्या महिला व बालकल्याण उपसभापती सौ. अनिताताई रविंद्रजी वाकोडे, नगरसेविका सौ. कान्होपात्राताई रामाभाऊ फाटकर, सौ. अरुणाताई मंगेशजी ठाकरे, सौ. दिपालीताई संदिपजी इंगळे, श्री कैलासभाऊ ठोकणे, श्री रवि (राणा ) घुंगड,श्री गजाननभाऊ गायकवाड,श्री ऋषिकेश पंचबुद्धे, अकोल्याचे नगरसेवक व रुग्णसेवक परागजी गवई यांच्यासह कुणबी समाज संघटना तेल्हाऱ्याचे पदाधिकारी श्री श्याम गावंडे, श्री वैभव तायडे, सौ. सुमनताई कोठे, सौ. आरतीताई गायकवाड यांचं शॉल व सन्मानचिन्ह देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कराळे यांनी, सूत्रसंचालन बंटी राऊत यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद बगले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू प्रबोधन मंडळ व कुणबी समाज संघटना तेल्हारा यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button