महाराष्ट्रविदर्भ

मा.राहुल नार्वेकर यांचा निकाल मुख्यमंत्री महोदयांच्या पक्षात लागल्याची वार्ता कळताच हिवरखेड मधील…

मा.राहुल नार्वेकर यांचा निकाल मुख्यमंत्री महोदयांच्या पक्षात लागल्याची वार्ता कळताच हिवरखेड मधील…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

हिवरखेड दि.११; विधानसभेचे १७ वे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर यांचा निकाल बुधवार १० जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या पक्षा कडून लागला ही वार्ता कळताच हिवरखेड येथील शिंदे गटातील शिवसैनिकांनी जल्लोषात आनंद साजरा केला. तेल्हारा तालुक्यामधील हिवरखेड गावातील मुख्य चंडिका चौक, विकास मैदान, शिवाजी चौक, ग्रामपंचायत कार्यालय मार्ग अशा विविध ठिकाणी शिंदे गटाकडून फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण व घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे तेल्हारा उप सर्कल प्रमुख प्रमोद निळे , हिवरखेड शहराध्यक्ष संदीप भाऊ बोडखे , पुरोषत्तम रेखाते, चंद्रकांत इंगळे, सचिन इंगळे, नंदकिशोर इंगळे, संदीप ढबाले, विशाल अढाउ, उत्तम वाकोडे, गोपाल लाखडे, विनोद कांतोडे, भगवान खिरोडकार, श्रावण कवळकार,यासह आधी शिवसैनिक उपस्थित होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button