
फरार वहानासह वाहन चालकास ग्रामीण पोलीसांनी केली अटक
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । अवैधरित्या रेती भरलेले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून कालखेड जवळ १७ वर्षीय युवतीला टिप्परखाली चिरडल्यानंतर घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झालेल्या टिप्परचालकास शेगाव ग्रामीण पोलीसांनी गजाआड केले आहे. घटनेनंतर युवतीच्या नातेवाईकांनी पो.स्टे. गाठून टिप्परचालकास तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. पोलीसांनी नागरिकांचा आक्रोश विचारात घेऊन आरोपीला काही तासांतच अटक केली.
घटनेसंदर्भातील माहिती अशी की, काल २९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कु.गौरी राजेश शेळके (१७) रा. मोदीनगर शेगाव हिला कालखेड रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेनंतर संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण पो.स्टे.ला | पोहोचून टिप्पर
चालकास तात्काळ पकडून आणा अशी
मागणी केली असता ग्रामिण पोलीसांनी ताबडतोब
सुत्रे हलवून टिप्पर चालक विकी संजय गोरले (२३)
रा.लोहारा, ता.बाळापूर जि. अकोला यास काही
तासांत पकडून गजाआड केले व आरोपीविरूध्द
कलम २७९, ३०४ अ भादंवि मोवाका १३४/
१७७, ५/१८१ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच
टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी २४४० जप्त
करून पो.स्टे.ला उभा केले. घटनेचा पुढील तपास
पोलीस करित आहेत.



