Uncategorized

एक दिवसासाठी मुख्याध्यापक, शिक्षक बनले विद्यार्थी

“जि.प. प्राथमिक शाळा जउळका चा उपक्रम”
“
विदयार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिनाचे महत्त्व खूप आहे. कारण शिक्षक विद्यार्थ्याला योग्य भविष्य आणि योग्य मार्गावर चालायला शिकवतो. तो विद्यार्थ्याला चांगल्या आणि अयोग्यची समज शिकवतो. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याला या दिवशी शिक्षकाच्या या मेहनतीबद्दल आभार मानण्याची संधी मिळते. म्हणून हा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खास मानला जातो.या वर्षी सुद्धा ५ सप्टेंबरला जि. प. प्राथमिक मराठी शाळा जउळका रेल्वे येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती ” शिक्षक दिन ” म्हणून साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण शाळेच्या मुख्याध्यापक राजु बळी यांनी केले. त्यानंतर शाळेतील कु. आर्पिता काटेकर, कु. साची चव्हाण, सम्यक आठवले, आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची माहीती पटवून देणारी भाषणे दिली. शाळेतील वर्ग ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ” शिक्षक दिन ” निमित्ताने वर्ग १ ली ते ४ थी पर्यंत वर्गामध्ये दिवसभर अध्यापन करुन ” स्वयंशासन ” हा उपक्रम राबविला. यावेळी प्रत्येक वर्ग शिक्षकांचे सहकार्य मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक राजु बळी तसेच शिक्षक अनिल सोळंके ,ताराचंद वाघमारे , प्रेमानंद डाखोरे , मन्मथ अब्दुलपुरे , सुरज अवचार, शिक्षिका शिल्पा कळस्कर, दिपाली इंगळे, सरोजिनी श्रीरामे आदीं शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक राजु बळी यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मन्मथ अब्दुलपुरे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रेमानंद डाखोरे यांने मांडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button