बुलढाणा मोताळा मार्गावरील चोरट्यांनी इलेक्ट्रिकल दुकान फोडले

१.७२ लाखांचा मुद्देमाल केला लंपास
मोताळा : एका वाहनातून आलेल्या
तीन अज्ञात चोरट्यांनी येथील इलेक्ट्रिकल अॅन्ड इंजिनिअरिंग दुकान फोडून १ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. बुलढाणा-मलकापूर मार्गावरील दुकानात झालेल्या या घटनेतील आरोपी हे सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.
बुलढाणा ते मलकापूर मार्गावर एका पेट्रोलपंपानजीक प्रदीप देवलाल पाटील यांचे प्रणव इलेक्ट्रिकल अॅन्ड इंजिनिअरिंग वर्क्स नावाचे दुकान आहे. या दुकानात २१ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी दुकानाच्या शटरचा कोंडा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील वायंडिंगचे १५ किलो वजनाचे १८ वायर बंडल, जुनी कॉपर वायर एक क्विंटल, मेटल बूश दोन क्विंटल स्टार्टरचे सटे पार्ट तसेच
चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ
मागील काही दिवसांपासून शहरासह परिसरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही ठिकाणी चोरटे सीसी कॅमेऱ्यात कैद होऊनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्क पॉवरफुल असल्याचे दिसून येत आहे.
मोटर भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक साहित्य असा अंदाजे १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. मुख्य मार्गावर असलेल्या दुकानात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी प्रदीप देवलाल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहे.



