खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रुग्णांनो, डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात घ्या उपचार

दुर्बिणीद्वारे किडनी स्टोन ऑपरेशनंतर रुग्णाने केले आवाहन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – सर्वसामान्यांना ऑपरेशनचा खर्च परवडत नाही, त्यामुळे आपण दुखणे अंगावर काढतो, परंतु आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेत मोफत ऑपरेशनची सोय डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध झाली आहे, मी स्वत: येथे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करुन घेतले आहे, येथील अनुभव खूप चांगला असून तुम्ही रुग्णांनो, तुम्ही देखील दुर्बिणीद्वारे उपचाराचा लाभ घ्या, असे आवाहन गणेश हिवरे यांनी केले आहे.
खामगाव तालुक्यातील लोखंडा पाडा येथील ३५ वर्षीय रहिवासी गणेश हिवरे यांना मागील सात वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास होता. शेतीकाम करुन उदरनिर्वाह चालत असलेल्या गणेशला ओळखीतील व्यक्‍तीने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाची माहिती दिली. ती ऐकून गणेश नामक रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार किडनी स्टोनचे ऑपरेशन करावे लागेल असा सल्‍ला डॉक्टरांनी दिला, तसेच शस्त्रक्रिया किंवा दुर्बिणीद्वारे ऑपरेशनचा पर्याय ही सांगण्यात आला.
सुप्रसिद्ध सर्जन डॉ.मिलिंद जोशी, डॉ.सेजोल कश्यप यांच्यासह टिमने व भुलतज्ञांच्या सहाय्याने दुर्बिणीद्वारे किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्यात आला. कमी वेदना, कमी रक्‍तस्त्राव आणि कमी चिरद्वारे ऑपरेशन यशस्वी झाले. तसेच रुग्णाजवळ असलेल्या आधार कार्ड व रेशन कार्डद्वारे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत रुग्णावर उपचार झाले. उपचारादरम्यान रुग्णालयातील स्वच्छता, डॉक्टरांचा संवाद, नर्सिंग स्टाफची सेवा, सात्विक जेवण अशा सर्व गोष्टींचा अनुभव चांगला राहिल्याने रुग्ण गणेश याने स्वयंस्फूर्तीने हॉस्पिटलची प्रशंसा केली व रुग्णांनी कुठल्याही आजारावरील उपचारासाठी येथे या आणि निश्चिंत राहा, असे आवाहन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button