खानदेशजळगावा जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांचे प्रसंगावधानभुसावळ रस्त्यावर अपघातग्रस्त रूग्णांना हलविले रूग्णालयात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका चारचाकी वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी राधेशाम राणे, आकाश पाटील व सहकार्‍यांनी प्रसंगावधान राखून तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविल्याने त्यांचे प्राण वाचले.
याबाबत माहिती अशी की, जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर माऊली पेट्रोलपंपाजवळ एर्टीगा या चारचाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात सिंधू बोरोले, शोभा अहिरे, सुनीता कळसकर, लता बाळापुरे, रेखा खोड, युवराज कासार, शकुंतला राखुंडे आणि निर्मला कळसकर हे आठ जण जखमी झाले. याचवेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी राधेशाम राणे व आकाश पाटील आणि त्यांचे सहकारी जात होते. अपघातस्थळी दाखल होताच तातडीने त्यांच्याच वाहनात आणून त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले. याठिकाणी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठात डॉ. प्रशांत सोळंके यांनी आपात्कालीन विभागात जाऊन अपघातग्रस्त रूग्णांची पाहणी करून डॉक्टर आणि स्टाफला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी वरीष्ठ लेखापाल योगेश पाटील, सुनील बोंडे, विकास बेंडाळे यांनीही सहकार्य केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button