महाराष्ट्र

क्ले बॉक्सिंग क्लबच्या खेळाडू गौरव बहारे याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

क्ले बॉक्सिंग क्लबच्या खेळाडू गौरव बहारे याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या विद्यमाने आयोजित राज्यक्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 2023-24 या स्पर्धेत नाशिक विभागीय व क्ले बॉक्सिंग क्लब भुसावळ यांच्या बॉक्सर गौरव बहारे यांचे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली. स्थानिक वसंत देसाई स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत बॉक्सर गौरव ची अकोला येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेकरिता निवड झाली गौरव हा क्ले बॉक्सिंग क्लबचा खेळाडू असून राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत 19 वर्ष वयोगटात उत्कृष्ट खेळी करीत याने सुवर्णपदक पटकाविले तसेच पुरस्कार वितरण आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट व महाराष्ट्राचे सचिव डॉ. राकेश तिवारी, उपस्थित होते या यशाच्या मागे क्ले बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक अनिल सपकाळे, लखन जंजाळे, पवन पारदे, तसेच मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाट, यांनी परिश्रम घेतले व क्ले बॉक्सिंग क्लब चे सदस्य अतुल महालकर, गिरीश पोद्दार, दीपक सपकाळे, राजेश दांडगे, यांनी गौरव ला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button