गुन्हेगारीबुलढाणा

शेलोडीतील जुगारावर डिवायएसपी पथकाचा छापा

१५ जुगाऱ्यांना पकडले १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर
शेगांव

खामगाव शहरालगताच
असलेल्या शेलोडी
शिवारातील सचिन मोहाळे यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी दुपारी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा मारून १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी घनश्याम ऊर्फ घनश्याम रमेश लोखंडे (४०) रा. माळीप रा, शेगाव, नागेश देवीदास नाटेकर

(२५) रा. दाळफैल, जितेश अरुण नाटेकर (२७) रा. रावण टेकडी, केशव किसन गुजर (३८) रा. शेलोडी, संतोष अरुण नाटेकर (३६) रा. रावण टेकडी, कृष्णा प्रकाश बाभूळकर (३०) रा. दाळफैल, भारत श्रीराम तायडे (५५) रा. शेलोडी, सचिन रामदास वाकोडे (२५) रा. गौरक्षण रोड, दाळफैल, सुधाकर सीताराम दामोधर (५५) रा. रावणटेकडी, आकाश राजेश दुधे (२६) रा. दाळफैल, अतुल विजय

शेगोकार (३२) रा. गौरक्षण रोड,

रवी सोनाजी विल्हरकर (४१) रा. शंकर नगर, राहुल अर्जुन मोरे रा. शेलोडी, संजय समाधान सरकटे (४८) रा. गौरक्षण रोड, राठी प्लॉट, सुजित भिकाजी इंगळे (२५) रा. दाळफैल, खामगाव हे जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून जुगाराचे एकूण नगदी २५,०२० रुपये, मोबाइल हँडसेट २ नग किंमत १० हजार रुपये, २ दुचाकी किंमत १ लाख २० हजार रुपये, असा एकूण १ लाख ५५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोउपनि, मनोज वासाडे, पोहेकॉ. सुधाकर थोरात, नितेश लासुरकर, योगेश कुंबारे यांनी केली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button