संविधानामुळेच माझ्या सारखा सामान्य माणूस आमदार : आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर — डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशातील तळागाळातील सामान्य माणूस सुरक्षित आहे,त्यांच्या तरतुदी मुळेच माझ्या सारखा सामान्य माणूस आमदार असल्याचे प्रतिपादन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
मुक्ताईनगर शहरातील गोदावरी नगरच्या परिसरात आंबेडकरी समाजाच्या मागणी नुसार पन्नास लाख रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आ. चंद्रकांत पाटील हस्ते पार पडले,त्या प्रसंगी ते बोलत होते.
तालुक्याच्या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह असावे,अशी अनेक वर्षाची मागणी होती ती पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार पाटील म्हणाले.सभागृहासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले.
भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्ताईनगर नगर पंचायतीचे नगरसेवक निलेश शिरसाठ होते. प्रास्ताविक प्रसिद्ध कथाकार दीपध्वज कोसोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आले सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी बौद्धाचार्य के .वाय. सुरवाडे , प्राध्यापक डॉक्टर संजीव साळवे , पंकज राणे , नगरसेवक मुकेश वानखेडे , सुनील पाटील , अफसर खान , नगरसेवक राजेंद्र हिवराळे , चांगदेवचे सरपंच निखिल बोदडे , युनूस खान , बौद्धाचार्य नामदेव पिराजी इंगळे , बौद्धाचार्य भिवाजी तायडे, प्रफुल्ल पाटील , दिलीप पाटील , गणेश टोंगे , निमखेडी बुद्रुकचे उपसरपंच प्रमोद इंगळे सुधाकर बोदडे तरोड्याचे सरपंच योगेश गायकवाड रुईखेडा सरपंच अजय गुरचळ , बौद्धाचार्य सुनील आढागळे , पंचशील टेलर , रवींद्र बोदडे , आ.चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी आणि प्रशांत पाटील , डॉ. दिलीप पानपाटील , डॉ. श्रीकांत पानपाटील , सखाराम हिरोळे , साहित्यिक जयवंत बोदडे , एड. अरविंद गोसावी , डॉ.अविनाश घाटे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका तसेच नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सुत्रसंचलन मोहन मेढे यांनी केले तर आभार शरद बोदडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडित सपकाळे, भीमराव घोरपडे, किशोर बोदडे, बी.डी.गवई यांनी परिश्रम घेतले.







