खानदेशजळगावा जिल्हा

मन्यारखेडा तलावावर ही सेवा मोहिम – गोदावरी फाउंडेशन संचलित

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे
मन्यारखेडा तलावावर ही सेवा मोहीम्
जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी एक जबाबदार नागरीक व आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे त्यामुळे रोगराई तसेच प्रदूषण कमी होते या उद्देशाने व स्वच्छता पखवाडा अंतर्गत येणारा व शासनाच्या निर्देशाने स्वच्छता ही सेवा ही मोहीम मन्यारखेडा परिसरामध्ये असलेल्या तलावाजवळ राबविली.
गणपती विसर्जनानंतर तलावाजवळ असलेले निर्माल्य, प्लास्टिक व इतर कचर्‍याचे विद्यार्थ्यानी संकलन केले. या मोहिमेमध्ये महाविद्यालयाच्या सुमारे १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके व नॅक समन्वयक डॉ. नीलिमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button