बुलढाणामहाराष्ट्र

शेळके म्हणाले ,महिलांनी उद्योगात झिप घ्यावी

शेळके म्हणाले ,महिलांनी उद्योगात झिप घ्यावी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसजिल्हा प्रतिनिधी

उषा इंगळे बुलढाणा

(चिखली) महिलांनी चूल आणि मुल ही चौकट कधीचीच ओलांडली आहे. स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे आल्या आहेत. जिल्ह्यात महिला बचत गटांचे चांगले जाळे विणले गेले आहे. बचत गटांच्या महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले. ॲडव्हायझर्स प्रा.लि. कंपनीच्या कार्यालयातमहिला बचत गटांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना संदीप दादा शेळके म्हणाले, महिलांमध्ये बचत, काटकर सर, सहनशीलता, जिद्द, चिकाटी हे नैसर्गिक गुण असतात. कर्ज घेतल्यावर महिला नियमित परतफेड करतात. त्यांचे एकही खाते थकीत नसते.महिलांनी कर्ज देताना बँक, पतसंस्था, हात आखडता घेत नाहीत. बचत गटाच्या महिलांना याचा लाभ घ्यावा घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करावा. स्वतःचा व्यवसाय सुरू करून उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.५० महिलांना ३ कोटींचे वाटपराजश्री शाहू परिवार महिला बचत गटांच्या कायम पाठीशी राहिला आहे. महिलांनी उद्योग उभारण्यासाठी नियमित आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाची उन्नती साधली आहे. दरम्यान २७ टेंबर रोजी संदीप दादा शेळके यांच्या हस्ते चिखली तालुक्यातील बचत गटांच्या ५० महिलांनी ३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button