Uncategorized

इसरूळच्या माजी सरपंचांनी उडवली महसूल प्रशासनाची झोप!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

खडकपूर्णा नदीतून रेतीचे अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक केली जात आहे. मधील मार्गावर लागणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांची परवा न करता टिप्पर चालक सुसाट वेगाने वाहने चालवतात. यापूर्वी या चालकांनी अनेकांचा बळी घेतला आहे. अशा दुर्घटना घडूनही महसूल प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने सं तप्त झालेल्या इस रुळचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी झालेल्या महसूल विभागाची झोप उडाली आहे.

चिखली तालुक्यातील इसरूळचे माजी सरपंच पती तथा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भुतेकर यांनी चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी इसरूळ मार्गाने रीतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांना थांबवून त्यांचा उपहा सात्मक आदर तित्य केला. त्यांना चहापान केला. सर्वसामान्यांच्या जीवाची परवा न करता महसूल वाल्यांच्या भीतीपोटी तुम्ही जोरात वाहने दामटता. तुम्ही अजिबात घाबरू नका, चिंता करू नका. चालक-मालक व लोकेशन देणाऱ्यांना येथे रोज चहा मिळेल. अधिकारी तो, जो अधिकाराची चोख अंमलबजावणी करतो. मात्र, अकार्यक्षम अधिकाऱ्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हेच कळत नाही. कुणाचा जीव गेला तरी त्यांना काहीच सोयरे सुतक नसते. त्यासाठी टिप्पर चालकांनो येथून पुढे शांततेने वाहने चालवा, असा सल्ला देणाऱ्या संभाषणाचा संतोष भुतेकर यांचा सर्वत्र होत आहे. या माध्यमातून संतोष भुतेकर यांनी महसूल प्रशासनाचा शाब्दिक उद्धार केल्याचे दिसत आहे. या फोटो त्यांनी महसूल विभागाचे चांगलेच वाभाडे काढले असून, रेती माफी यांना मार्मिक फटके दिले आहेत. निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्याचे भाव वाढतात. त्यामुळे निवेदन द्यायचे नाही, असेही ते संतापून बोलताना दिसत आहेत. महसूल प्रशासन जागे होत नसल्याने देऊळगाव राजा व चिखलीच्या तहसीलदारांना बांगड्या भरू, असा इशाराही त्यांनी संभाषण अखेर दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button