बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्याआहेत या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या वतीने दि.१२/१२/२०२२रोजी सोमवारला ठीक १२.०० वाजता पोलीस स्टेशन शेगाव येथे गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव व शहर च्या वतीने निषेध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी मिलिंद चराटे
वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव व शहर जि.बुलढाणा
समस्त पदाधिकारी व आजी माजी पदाधिकारी यांना
जय भीम जय शिवराय आपणास या पत्राद्वारे सुचित करण्यात येते की भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले, व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा व महाविद्यालय सुरू केले असे बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्याआहेत या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या वतीने दि.१२/१२/२०२२रोजी सोमवारला ठीक १२.०० वाजता पोलीस स्टेशन शेगाव येथे गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव व शहर च्या वतीने निषेध नोंदणी साठी हजर राहावे ही विनंती…
विनीत
वंचित बहुजन आघाडी ता. शेगांव
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर वंचित बहुजन महिला आघाडी ता. शेगांव
वंचित बहुजन महिला आघाडी शहर शेगांव
वंचित बहुजन युवा आघाडी ता.शेगांव
वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव शहर
आपला विश्वासू
दा.भि.अंभोरे
(ता.अध्यक्ष व.ब.आ.शेगांव)
(टीप. आजी माझी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठरलेल्या वेळेतच हजर राहावे ही नम्र विनंती)




