सरदार एस. के. पवार विद्यालयात पालक – शिक्षक सभा

संपन्ननगरदेवळा ता. पाचोरा :- आज विद्यालयत सकाळी 10 वा. सरस्वती प्रतिमा पुजन करून सुरू करण्यात आली, प्रथम पालक -शिक्षक सभेचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. व्ही. बी. बोरसे सर यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष पदी श्री. श्रीनिवास भामरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पालक- शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या अभ्यास, सुरक्षितता, शिस्त अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, इन्द्रनील भामरे, भोला धनराळे, अशपाक बेग, यांनी आपले मनोगत वेक्त केले व आपल्या सुचना मांडल्या, पालकांनकडुन आलेल्या सूचनांचे नक्कीच विचार करून अंबल बजावणी केली जाईल असे मुख्याध्यापक बोरसे सर यांनी आस्वासीत केले.प्रसंगी मुख्याध्यापक . श्री. व्ही. बी. बोरसे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल पालक – शिक्षक संघाकडुन सत्कार करण्यात आला. सभेचे सुत्र संचालन श्री. जी. यु. पवार सर, यांनी केले, प्रस्तावना श्री. ठाकुर सर यांनी केले तर आभार श्री. आमले सर यांनी केले.



