महाराष्ट्र

*डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात ‘पंचप्रण शपथ’ कार्यक्रम संपन्न*

*डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात ‘पंचप्रण शपथ’ कार्यक्रम संपन्न*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस व्हि.एम.घोडे तेल्हारा तालुका प्रतिनीधी गाडेगाव: दि.9 बुधवार रोजी डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘मेरी माटी, मेरा देश’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली असून या उपक्रमांतर्गत दिलेल्या आदेशान्वये पंचप्रण शक्तीच्या नमुन्यानुसार दिनांक ९/८/२०२३ ला सकाळी ठीक दहा वाजता विद्यार्थ्यांसह महाविद्यालयात पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम इतिहास विभागाच्या वतीने घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले तर प्रमुख पाहुणे म्हणून तेल्हारा तहसीलचे नायब तहसीलदार संजय ढगे उपस्थित होते. याशिवाय विचार मंचावर डॉ. एम. एम. कवरके, डॉ. आर. एस. सुडके, प्रा. गजानन इंगळे, प्रा. स्वप्निल फोकमारे, डॉ. रजनी बोबडे, प्रा. दीपश्री मथारीया, प्रा. अनुप खिरोडकर, प्रा. रसिका अवताडे, प्रा. रुपाली देशमुख, प्रा. कु. खारोडे, प्रा. उन्हाळे, प्रा. भूषण देशमुख, प्रा. अभिनव पुंडकर, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी दिलीप खंडारे, हरिभाऊ तालोट, अशोक राठोड, अमोल गेबड, मंगेश देवतळे, अनंता सोनमाळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. धीरजकुमार नजान यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक एम.पी. चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन ढोले, अभिजीत लोखंडे, हिम्मत फोकमारे इत्यादींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम इतिहास विभागातर्फे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button