ठाण्यातील ‘बिकानेर’ मिठाई दुकानावर कारवाई.

ठाण्यातील ‘बिकानेर’ मिठाई दुकानावर कारवाई.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर ठाणे परिसरातील घोडबंदर रोड वरील कासारवडवली या ठिकाणी बिकानेर स्वीट्स हे प्रचलित असे मिठाईचे दुकान आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांमार्फत बुधवारी या दुकानाची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या दुकानामध्ये विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई व फरसाण असे पदार्थाचे उत्पादन करीत असल्याने आढळून आले. अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे उल्लंघन केल्याबद्दल त्रुटीची पूर्तता करेपर्यंत बिकानेर स्वीट्स या दुकानास व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेे. अशी माहिती अन्न विभागाचे उपायुक्त व्यं. व. वेदपाठक यांनी दिली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या अध्क्षतेखालील कोंकण विभागाची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना धाडसत्र राबवून अशा पद्धतीच्या कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.



