खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

जळगावला सक्षम आमदार पाहिजे.

जळगावला सक्षम आमदार पाहिजे.

आमदार हा साधारणतः एक तालुका किंवा पांच लाख मतदारांचा प्रतिनिधी असतो.जरी मतदान तीन लाख होत असले आणि दिड दोन लाख मतदान आमदाराला मिळाले असले तरीही तो पांच लाख लोकांचे प्रतिनिधित्व विधानसभेत करतो.प्रतिनिधी म्हणजे वर्षांतून तीन वेळा विधानसभेत बसणे, निधी मागणे इतकेच काम नसते.बसणे आणि निधी मिळणे तर शेड्युलड वर्क आहे.जसा एखादा आंधळा पांगळा,मुका बहिरा जरी लग्नाच्या पंक्तीत बसला तर त्याला सर्वाच्या इतकेच वाढून मिळते.असे नाही कि,हा आंधळा आहे म्हणून कमी द्या किंवा हा बहिरा आहे म्हणून कमी द्या.उष्टे पडले तरी वाढून मिळतेच.तसे आमदार येडा गबाडा दारूडा बेवडा ,लुळा पांगळा असला तरीही निधी मिळतोच.मुख्यमंत्री जरी ठाणे च्या मेंटल हॉस्पिटलमध्ये अडमिट असले तरीही वितरीत निधी च्या पांच टक्के म्हणजे वीस पंचवीस कोटी दरमहा मिळतातच.अर्थात त्यापैकी काही वाटा हिस्सा पक्षाचा असतो.तसे आमदारांना निधी मिळतोच.आणि निधी मिळतो म्हणजे मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री मेहरबानी करीत नाहीत.तो पैसा आपण जनतेच्या करातून जमा होतो.इतका कि,करदात्यांचे कंबरडे मोडते.आणि मंत्र्यांचे अनेक जिल्ह्यात वाईन शॉप उघडते.चार पांच ठिकाणी बंगले असतात.तीन चार ठिकाणी कुटुंब असते.पैकी क्वचित आमदारांचे दुसरे कुटुंब किंवा तिसरा बंगला उघडकीस येतो.इतरांचे रहस्य मृत्यू नंतर उघडते. आमदार हा विधानसभेत राज्य स्तरीय कायदे बनवणे, रद्द करणे, समर्थन करणे, विरोध करणे या कामांसाठी असतो.तसे तर जळगाव जिल्ह्यातील एकाही आमदारांने ते काम केल्याची नोंद नाही.फॅशन शो मधे रेबीन कापणे,दुकानांचे फित कापणे,कुदळ मारणे,नारळ फोडणे याची मात्र भरपूर नोंद आहे.आता तर अनेक आमदार लग्न ,मौत,बारसे ,घरभरणी ची कामे जास्त करतात.नवरात्र उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती ला वर्गणी देऊन प्रसिद्धी मिळवतात.आणि आम्ही वेंधळे,येडे गबाडे त्यांचे आभार मानतो.म्हणे,तुमचे पाय आमच्या घराला लागले.आमचे जिवन सार्थकी लागले.उद्या आमचे पोरगं खड्यात जाऊन मेले किंवा रेतीच्या डंपरखाली चिरडून मेले तरी चालेल.ती ईश्वराची कृपा पण तुम्ही घरी आले ती तुमची कृपा. आमदार हा त्या विधानसभा मतदारसंघातील राज्य सरकारचा मुतालिक, ,डिप्लोमॅट असतो.मंत्री बनला तर सरकारचा एक हिस्सा बनतो.तर त्याच्या मतदारसंघातील संविधानाच्या राज्य सुचीत असलेल्या खात्यातील सुद्धा नियंत्रक असतो.जे भारतात रावळ,सरदार,गडकरी युरोपमधे राव,उमराव,मेयर होते.जर कोणाचे शेती विषयक समस्या असेल तर तहसीलदार कलेक्टर ला आदेश देऊन निपटारा करू शकतो.वीज,शिक्षण, आरोग्य, पोलिस, सार्वजनिक बांधकाम,खनिज, जलसंपदा,सहकार , रस्ता परिवहन ,बाजार समिती , जिल्हा परिषद , नगरपालिका ,समाज कल्याण अशा त्र्याहत्तर खात्यांवर नियंत्रण ठेवू शकतो.तितके ज्ञान त्या आमदारांना असणे आवश्यक असते.तरच तो कलेक्टर, तहसीलदार,बीडीओ, सीईओ, पोलिस निरीक्षक,एसपी, आयुक्त , शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, जातपडताळणी अधिकारी अशा अनेक अधिकाऱ्यांना सुचना देऊन कामांचा निपटारा करू शकतो.पण तसे न करता तो रेतीचे ट्रॅक्टर सोडवणे, डंपर सोडवणे,दारू पिणारे सोडवणे, डान्सबार मधे पकडलेले सोडवणे, सट्टा वाला सोडवणे अशी कामे करतो.त्यामुळे क्रिमिनल लोक आणि करफ्ट नोकर त्याचे चाहते असतात.हिच माणसे गाडीला भोंगा बांधून आमदाराचा प्रचार करतात.म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आमदार, खासदार नगरसेवक, झेडपी सदस्य निवडून येतात.जर तो खाऊ पिऊ घालतो,दारू मटण देतो,उत्सवाला देणगी देतो तर रस्ता गटार बांधकामातून काढणारच.टक्केवारी घेणे, भ्रष्टाचार करणे त्याला अनिवार्य बनते.आधिकतम झोपडपट्टी भागातून गुंड, गुन्हेगार नगरसेवक निवडून येतात.महापौर , उपमहापौर बनतात.असे पॉकेटमधे पैसे देऊन आमदार लिड घेतात.तर तो प्रामाणिक कसा राहील?त्याचा उगम चिखलातून झाला असेल,वरवर कमळ दिसत असेल तरीही ते आतून कोरपळ असते.नागफण असते.मतदारसंघात बामुळ उगवला तर आंब्याची आशा कशी करता येईल? म्हणून तर जळगाव मधे दारूवाले,रेतीवाले, डान्सबारवाले ,झन्नामन्नावाले नगराध्यक्ष महापौर आमदार बनले. आमदाराचे नियंत्रण कलेक्टर, सीईओ,एसपी , आयुक्त यांचेवर असले पाहिजे.त्यांच्यापेक्षा जास्त प्रशासकीय ज्ञान त्याला असले पाहिजे.कलेक्टरला विचारणारा पाहिजे,सांगा,काल काय काम केले?आज काय काम करणार आहात?तुमचे मोव्हमेंट रजिस्टर दाखवा.तुमचे लॉगबुक दाखवा. असे विचारणारा आमदार जळगाव ला हवा आहे.मताचे पांचशे नाही मिळाले तरी चालेल, संध्याकाळचा चष्का आणि चखणा नाही मिळाला तरी चालेल.पण आमदाराच्या फोनवर राशनकर्ड मिळाले पाहिजे.फोनवर शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे.फोनवर जातीचा दाखला मिळाला पाहिजे.फोनवर सातबारा मिळाला पाहिजे.फोनवर बांधकाम मंजूरी मिळाली पाहिजे.फोनवर वीज मीटर मिळाले पाहिजे.असे आमचा तुमचा आमदार करीत नाही म्हणून तरूणांना,नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलफाटा घालाव्या लागतात.चपला झिजवाव्या लागतात. तावातावात येऊन तोरा मिळवतात.नाहीतर चिरीमिरी देऊन काम करून घ्यावे लागते. आता जळगाव साठी बुद्धीमान, ज्ञानी, उच्चशिक्षित आमदार पाहिजे.फक्त राजकीय नव्हे शासकीय, प्रशासकीय ज्ञान असणारा पाहिजे….

शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button