जळगावा जिल्हासंपादकीयसामाजिक

जळगाव शहरातील “चक दे इंडिया “!

जळगाव शहरातील “चक दे इंडिया “!

जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण एम जे कॉलेज.समोरच हे खानपान,कैंटीन.रोजचे हजारो विद्यार्थी येथे मीठ मिरचीचा चष्का घेतात.गुळाच्या चहाचा सुरका मारतात.पण समोर हे उघड्या गटारीचे विहंगम दृश्य पाहून, मसालेदार गटारकडे पाहून चहा जास्त मजेदार वाटत असेल.या समोरच दोन बॅंका आहेत.तेथे रिटायर्ड पेन्शनर लोकांची वर्दळ असते.चष्मा,काठी नाहीतर थरथरता हात धरणारा तिसरा तगडा हात असतोच.येथूनच अकरा खात्याचे माजी मंत्री एकनाथ खडसेंचा राजकीय मुख्यालय आहे.माजी आमदार चंदू पटेल यांचा महाल आहे.पुढे जाऊन पालकमंत्री चा मुक्काम असणारे अजिंठा रेस्ट हाऊस आहे. कधी काळी राष्ट्रपती उतरले होते.समोरच कलेक्टर चा बंगला आहे.कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी! इतक्या प्रशस्त आणि वैभवशाली या रस्त्यावर हे जळगाव महापालिकेची गटार गंगा उघडी नागडी वाहाते.तिच्याकडे पाहूनच तरूणांना उघडे नागडे राहाणे आवडत असावे.उघडे नागडे राहाण्यात जरा मॉडर्न वाटते म्हणून.मला वाटते महाजन आणि मामाच्या दृष्टीने हेच शांघाय हॉंगकॉंग असावे.ही वेगळी कल्पकता भाजपचे कमळ उगवण्यासाठी, फुलवण्यासाठी केली असावी.कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे.तसेच ही गटार गंगा भारतीय संस्कृतीचे प्रतिक म्हणून जतन केली असावी.लवकरच याची नोंद गिनीज बुक मधे करायला हरकत नाही.याच गटार गंगेचा मोठा पोर्ट्रेट फोटो जळगाव महापालिकेच्या सतरा मजली इमारतीवर लोगो म्हणून लावला तर जास्त उचित ठरेल. जळगांवचे हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून रेल्वे स्टेशन वर नोटीस बोर्ड लावले तर अजिंठा वेरूळ आधी येथे भेट देणे जास्त संयुक्तिक ठरेल.किमान दुरून आलेल्या यात्रेकरूंना आमची सडकी डोकीची जाणिव तरी होईल.मला वाटते मा.नरेंद्र मोदींची एखादी प्रचार सभा येथे लावली तर “शायनिंग इंडिया” चे प्रदर्शन होऊ शकते.ते पाहून महाजन आणि मामांना शाबाशकी देतील.म्हणतील,” चक दे इंडिया “

….. शिवराम पाटीलमहाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button