सामाजिकसांस्कृतिक

गण गण गणात बोते च्या गजरात श्री संत गजानन महाराज पालखीचे रिधोऱ्यात आगमन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – रिधोरा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे मोठ्या थाटात आणि वाजत गाजत आगमन झाले या वर्षी पालखीचे हे 2 वे वर्ष आहे पासून ही परंपरा सुरू आहे दरवर्षी खंडाळा (शिंदे) येथून सदर पालखी ही रिधोरा येथून जात असुन पालखी येणार या दिवशी रिधोऱ्यात आनंदाचे वातावरण असते गावातील महिला आप आपल्या दारात रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले.
गावातील प्रवेशद्वार जवळ पालखीचे फटाके वाजवून व ओवाळून स्वागत केले नंतर यांनी श्री संत गजानन महाराज व त्यानंतर रिधोरा येथे पालखीने विसावा घेत यावेळी तेथे थोडा आराम करून प्रसादाचे वाटप केले.
त्यानंतर पालखी ही सम्पूर्ण गावा मध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांना व्यवस्था ही राजू भिखाजी इढोले यांच्या वतीने करण्यात आली. व पालखी मधील सर्व टाळकरी,भजनी,वारकरी मंडळीची भोजनाची व्यवस्था राजू भिखाजी इढोले यांच्या कडून रिधोरा येथे करण्यात आली होती,तेथून मेडशी कडे गेले तसेच गावातील सर्व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती व रिधोरा येथील सर्व मित्र मंडळांनी परिश्रम घेतले, श्री ची पालखी येताच गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button