लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव – :मालेगाव येथील साहित्यरत्न जगविख्यात अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहिर डॉ.अण्णाभाऊ साठे फाऊडेशन व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती च्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने ट्रॅकर सुशोभित सजावट मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे तेलचीत्र व घोडा हे विशेष आकर्षण भव्य प्रतिमा ठेऊन सजवण्यात आले होते. वीर लहुजी वस्ताद साळवे चौक पासून मिरवणूक सुरवात झाली लहुजी वस्ताद साळवे पुतळा शिव चौक दुर्गा चौक येथे कार्यक्रमाची सांगता झाली
यामध्ये पदमश्री पुरस्कार प्राप्त ना.च.कांबळे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्या विषयी प्रकाश टाकला यशवंतजी हिवराळे (पत्रकार ),डॉ.विवेक माने ,कृष्णा गायकवाड,पंकज गायकवाड, यांनी आपले मनोगत व्यक्त केले
मालेगांव नगरी मधील मान्यवर मंडळी उपस्थिती होती त्यामध्ये दादासाहेब ढोबळे,अभिषेक मुंदडा, सुरेश मुंडे, आनंद बिर्ला, संतोष तिखे, संजु केकन, चेतन काबरा, अभी घुगे. डॉ पवन मानधने. डॉ उमेश तारे, अरूण बळी, अजय इंगोले, अभिषेक देवकते, सागर अहिर,
आणि उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष बाजड, संजू गायकवाड, द्यानबा जाधव, प्रकाश गायकवाड, सदाशिव गायकवाड, मधुकर गायकवाड,अर्जुन धबडघाव, समाधान नितनवरे, रिषभ बाजड,रवी जाधव, शिवम गायकवाड, परमेश्वर देवकते, गणेश खडसे, योगेश शालिकराम गायकवाड,पवन अवचार, संतोष पांढरे किरण गायकवाड,संजय उबाळे, विठ्ठल साठे, अमोल बांगरे, दीपक गायकवाड, पवन गायकवाड, महादेव देवकते, हे सर्वजण उपस्थित होते आणि सकल मातंग समाज बांधव भगिनी व सर्व पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रार्यकामचे संचालन सागर देवकते यांनी केले व आभार प्रदर्शन भारत तायडे यांनी केले. अतिशय शिस्तबद्ध रीत्या ही मिरवणूक काढण्यात आली.



