तेल्हारा तालुक्यातील घोडेगांव जि.प.शाळेत ”बालक – पालक”.

तेल्हारा तालुक्यातील घोडेगांव जि.प.शाळेत ”बालक – पालक”..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी –
व्ही एम घोडे
घोडेगाव दि.8 छोट्या मुलांना शाळेप्रति गोडी निर्माण व्हावी, शाळेतील आनंदादायी वातावरण पाहून या लहान विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा घोडेगाव येथे दुसरा बालक – पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर मेळावा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शारदा नागेश दामोदर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका सौ. एम. एस. तायडे मॅडम , पदवीधर शिक्षक व्ही. एन बारगीर सर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. तर बालक पालक मेळाव्याची जय्यत तयारी सौ. बारगीर मॅडम व सौ. झाडे मॅडम यांनी करून घेतली, शाळेतील मंगलमय वातावरणात इयत्ता पाहिलीतील विद्यार्थी विद्यार्थिनी तथा माता पालक वर्ग पूर्णतः तल्लीन झाले होते, कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात बारगीर सरांनी पालकांना महत्वपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, चित्र ओळख, जोड्या लावणे इ. संबंधित माहिती दिली.
सदर कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सौ. अरुणा दामोदर, मदतनीस अर्चना ढोले तसेच बराचसा पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. झाडे मॅडम तर आभार प्रदर्शन सौ. बारगीर मॅडम यांनी मानले. दामोदर सर सह विजय घोडे तेल्हारा ✍️



