महाराष्ट्र

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा शहरामध्ये 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे

तेल्हारा दि.5:- तेल्हारा शहरामध्ये मा.राज्यमंत्री लोकआधार वंदनीय बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसा निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम दिव्यांग बांधवांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आज शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष युवक उपजिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी प्रहारसेवक यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाची चळवळ उभी राहली पाहिजे या करिता तब्बल ३१ रक्तदात्यानी रक्त दान केले. रक्तदात्यांची नावे पुढीलप्रमाणे- शिवचरण कराळे ,ऋषिकेश पिसे ,विशाल बग्गन ,कार्तिक वसतकर ,सुरज चिकटे ,शुभम लाजूरकर ,पवन वाडेकर ,ऋषिकेश वरणकर ,आदित्य उमाळे ,पुरुषोत्तम मानकर ,रिबेल पाटील ,प्रणव देशमुख सुरज भैय्या खरोडे ,दर्शन भिसे ,मुन्ना भाऊ बिहाडे ,शुभम काळे ,अंकुश जवंजाळ ,सुरज तायडे आदी लोकांनी रक्तदान केले.
गेल्या अनेक वर्षापासून “रस्त्यावर रक्त सांडल्या पेक्षा, रक्तदान करा” भाऊंच्या या विचारांचा वसा घेत दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा रक्तदान व रुक्षरोपनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला होता.यावेळी उपस्थितांमध्ये दर्शन भिसे ,शुभम काळे ,संदिप ताथोड ,पवन वाडेकर ,अंकुश जवजांळ ,संध्या ताथोड ,शिवा कराळे ,पुरुषोत्तम ताथोड ,वैभव, पवन घुगंळ ,सुरज चिकटे ,पवन वसतकार ,रुक्षिकेश वरणकार ,सह तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच बीपी पाटील ब्लड बँक अकोला येथून आलेले डॉक्टर ठाकरे ,डॉक्टर वानखडे व त्यांची टीम यांच्या कौशल्यातून योग्यरीत्या रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला, तसेच डॉक्टरांनी रक्तदात्याला आवश्यक मार्गदर्शनही केले .कार्यक्रमाच्या अंती सुरज भैया खारोडे यांनी सर्व रक्तदाते व प्रहार सेवकांचे आभार मानले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button