लोणी बू येथे राष्ट्रीय गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत सोयाबीन बियाणे वाटप

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोड :- तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज दिनांक 2 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय गळीत धान्य विकास कार्यक्रम सन 2023- 24 अंतर्गत कृषी विभागामार्फत लोणी बुद्रुक येथे 25 सोयाबीन उत्पादक शेतकरी निवड करण्याकरीता प्रथम गावातील शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली . यामध्ये जवळपास 245 शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली त्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या सदरच्या चीठया उपस्थित लहान मुलाच्या हाताने 25 चिठ्या निवडून प्रतेक लाभार्थ्याला प्रत्येकी 22 किलो महाबिजचे सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले या वेळी ग्राम पंचायत चे सरपंच राजू चौगुले , उपसरपंच पारवे, तसेच सर्व सदस्य तसेच कृषी सहायक कविता कांबळे, तसेच नाव नोदणी करीता दीपक पाटील बोडखे यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी शांताबाई लांडगे, सखाराम इंगोले , पुंजाजी साखरकर , संदीप बोडखे, वैजनाथ चौगुले, कैलास चौगुले, अशोक बोडखे, पार्वती चौगुले, लक्ष्मण इटकर ,शांताबाई लष्कर, कैलास बोडखे, बाबाराव सानप, सखाराम गरकळ, कलाबाई मुदळकर, शिवराम चौगुले ,सखाराम चौगुले गयाबाई बोडखे,वामन नलनकर, कैलास राऊत ,रीता बोडखे, संतोष चौगुले आदी शेतकऱ्याची ईश्वर चीठीने निवड करण्यात आली लोणी बू गावाच्या इतिहासात दुसऱ्यांदा बियाणे शेतकऱ्यांना वाटप झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले असून कृषी सहायक कांबळे मॅडम यांचे आभार व्यक्त करण्यात आले.



