Uncategorized

निर्दयतेने जनावरांची वाहतूक करताना मिळून आलेल्या गुन्हेगारांवर शेगाव शहर पोलिसांनी केली कारवाई

निर्दयतेने जनावरांची वाहतूक करताना मिळून आलेल्या गुन्हेगारांवर शेगाव शहर पोलिसांनी केली कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

मिळालेली माहिती अशी आहे की,आज दिनांक 01/07/2023 रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक टाटा कंपनीच्या निळ्या रंगाच्या वाहनांमध्ये 4 गोवंशांना वाहनात टाकून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना जबरदस्तीने अडचणीत दोराने बांधून कोंडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बाळापुर रोड ने घेऊन जात आहे. अशा माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील सोबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे पोलीस नाईक गणेश वाकेकर पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे निळसर रंगाचे वाहन क्र. MH-28-BB- 5278 ला दुपारी 01:30 वा. सुमारास आनंद विहार परिसरामध्ये नाकाबंदी करून अडवले. त्यांनी सोबत उपस्थित असलेल्या पंचासमक्ष वाहनातील जनावरांचे पाहणी केली असता त्या मध्ये लाल रंगाचे दोन बैल, एक काळया भुरकट रंगाचा बैल, तसेच एक पांढरे रंगाचा बैल असे एकुण 4 गोवंशीय जनावरे बळजबरीने वाहनात कोंबून दोराने बांधून निर्दयतेने वाहून नेतांना मिळून आले. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास त्याचे नाव व गावाबाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव ( आरोपी क्र.1) अमीर खान बुढण खान वय 24 वर्षे रा. इदगहा प्लाट शेगाव असे सांगीतले. त्यास वाहनातील जनावरे बाबत अधिक विचारना केली असता त्याने वाहनातील नमूद चार गोवंशे ही ( आरोपी क्र.2) मोहमंद शकील मोहमंद शफी वय 42 वर्षे रा. बाळापुर याचे सांगणेहून कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड बकाल तालुका संग्रामपूर येथुन खरेदी केले व बाळापूरला घेऊन जात असल्याचे सांगितले. वरून दोन्ही आरोपीतांचे कृत्य हे कलम कलम 11(1) (घ) (ड) (च) प्राणी निदर्यतेने वागविने अन्वये गुन्हा होत असल्याने प्रकरणी सविस्तर घटनास्थळ पंचनामा कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला गुण्याचा पुढील तपास पोपने राहुल काटकाडे हे करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button