महाराष्ट्रमुबई

सत्यासाठी संघर्ष

सत्यासाठी संघर्ष….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

ठाणे जिल्हा

प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर

राहुल गांधी यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास कायद्यानुसार राहुल गांधी यांना पुढील आठ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यान न्यायालयाने नकार दिल्यास त्यांना २०२४ची लोकसभा निवडणुक लढवता येणार नाही. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शकते, अशा प्रकारे एकूण आठ वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही. राहुल गांधी थेट २०३४ची लोकसभा निवडणुक लढवू शकणार आहेत.राहुल गांधी यांना तरुण नेता म्हणून ओळखले जाते. पण जर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर ते जेव्हा ६३ वर्षांचे होतील तेव्हाच निवडणूक लढवू शकतील. जर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर मध्यावधी निवडणुका लागल्या तरच राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळू शकते.यामुळे आज मंत्रालय मुंबई येथे मौन सत्याग्रह करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button