बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

…. स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे/////////////////////////////// जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये नगर,नाशिक जिल्ह्यात खरिपातील लाल कांद्याचे भाव कमी झाले .म्हणून सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली . परंतु विदर्भातील कांदा सततच्या अवकाळी पावसाने पूर्णपणे सडून गेला . एकरी 50 ते 60 हजार रुपये लागलेला लागवडीचा खर्चही भरून निघत नाही . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कांद्याला सरकारने नुकसान भरपाई द्यावी म्हणून निवेदन देऊन आंदोलने झाले.मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले तरीसुद्धा कांदा नुकसानीचा पंचनामा नाही .शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक दमदीची सुद्धा मदत नाही .अजूनही हे नालायक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कांद्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी का बोलत नाहीत नागरिकांनी यांचा जाब विचारला पाहिजे… कापूस पडला शेतकऱ्याच्या घरी… कांदा पडला बांधावरी…आणि हे सरकार म्हणताय शासन आपल्या दारी….. कृष्णा भिसे पाटील एक शेतकरीपुत्र

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button