बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव तालुक्यातील गायगाव कनारखेड गट ग्रामपंचायत चे ग्राम सेवक गावंडे यांची तत्काळ बदली करा मागणीसाठी शेगाव पंचायत समिती कार्यालयात प्रहार संघटनेने आज ठिय्या आंदोलन

सुरू केले आहे. शेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेगाव खामगाव रोडवरील गायगाव कनारखेड गट ग्रामपंचायत चे ग्रामसेवक म्हणून आर पी गावंडे कार्यरत आहेत ग्रामसेवक गावंडे यांच्या विरोधात त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल गायगाव कनारखेड गट ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करून एका निवेदनाद्वारे त्यांच्या बदलीची मागणी केली होती. गायगाव गट ग्रामपंचायत चे ग्रामसेवक गावंडे जातीयवादी मानसिकतेचे असून सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांचा ते सतत अपमान करतात त्याचप्रमाणे मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने गावातील विकासाला कीड बसली आहे असा आरोप करून प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व या भागाचे सर्वेसर्वा निलेश गोंगे यांच्या नेतृत्वाखाली गायगाव बुद्रुक गट ग्रामपंचायत च्या महिला सरपंच सौ शारदा पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी शेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा प्रहार संघटनेचे निलेश घोंगे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहेस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस श्याम पहुरकर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button